महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि ‘अग्निपथ’चा निषेध ; काँग्रेस नेत्यांचा राजभवनाला घेराव

महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि 'अग्निपथ' या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस शुक्रवारी राजभवनाचा घेराव घातला आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते.

  मुंबई : महागाई, जीएसटी, बेरोजगारी आणि ‘अग्निपथ’ या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस शुक्रवारी राजभवनाचा घेराव घातला आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते.

  नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे आणि निर्णयांमुळे महागाई गगनाला भिडत आहे. त्याचवेळी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून सर्वसामान्यांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.

  देशात बेरोजगारी शिखरावर आहे

  देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली असून तरुणांचे भविष्य अंधारात असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्था ही समस्या गंभीर बनत चालली आहे. याच्या निषेधार्थ आज काँग्रेसतर्फे राजभवनाला घेराव घालत जेलभरो आंदोलन करण्यात आले असल्याचे पटोले यांनी सांगितले.

  राज्यपालपदाची प्रतिष्ठा पणाला

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा मुद्दाही पटोले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, यापूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलताना अनेक वेळा आपल्या राज्यातील महान व्यक्तींचा अपमान केला आहे. पटोले म्हणाले की, कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून त्यांच्या भाषणातून नेहमीच भाजप आणि आरएसएसची शिकवण दिसून येते.

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जेलभरो आंदोलन सुरुवात झालीआहे. या मोर्चात राज्यातील स्थानिक नेते, आमदार, खासदार, अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर सर्व जिल्हा मुख्यालयातील नेते व कार्यकर्तेही केंद्र सरकारच्या विरोधात सहभागी झाले आहेत.