भिडे वाड्याच्या स्मारकासाठी ६० कोटांची तरतूद करून द्या; पुणे शहर काॅंग्रेसची मागणी

भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची त्वरीत सुरूवात करून शासनाच्या वतीने त्यास ५० ते ६० कोटी रूपयांची तरतूद करून द्यावी, अशी मागणी पुणे शहर काॅंग्रेसने केली आहे. भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले जात आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कसबा ब्लॉकच्या वतीने भिडे वाड्यासमोर नागरिकांना साखर वाटप केले.

    पुणे : भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची त्वरीत सुरूवात करून शासनाच्या वतीने त्यास ५० ते ६० कोटी रूपयांची तरतूद करून द्यावी, अशी मागणी पुणे शहर काॅंग्रेसने केली आहे. भिडे वाड्यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले जात आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कसबा ब्लॉकच्या वतीने भिडे वाड्यासमोर नागरिकांना साखर वाटप केले.
    यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की,‘‘गेली २५ ते ३० वर्षांपासून काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे पक्षाचे विविध पदाधिकारी भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे म्हणून विविध पध्दतीने मागणी, आंदोलने, मोर्चे काढत होते. काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन महापौर दिप्ती चवधरी यांनी तसा प्रथम ठराव पुणे महानगरपालिकेत पारीत केला होता. आमच्या या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने दाद देवून आज भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले याचा आम्हाला आनंद झाला आहे. आता हे स्मारक हाेण्यासाठी आर्थिक तरतुद शासनाने करावी ’’.
    यावेळी रमेश बागवे, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी,  अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, राहुल शिरसाट, मुख्तार शेख, बाळासाहेब अमराळे,  मेहबुब नदाफ आदी उपस्थित हाेते.