‘दै. नवराष्ट्र’ने फोडली वाचा! पोलिस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर ; प्रलंबित ५८५ पोलीस उपनिरीक्षकांची यादी जाहीर

विद्यार्थ्यांनी मानले मंत्री भुजबळांचे आभार , महाज्योतीचे माजी संचालक यांच्या प्रयत्नाला यश

    पुणे :   मागील तीन वर्षापासुन एमपीएससी ने घेतलेल्या उपनिरीक्षक पोलीस पदाचा निकाल जाहीर होत नव्हता. त्यामुळे ही परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी तनावात होते.त्यांनी महाज्योतीचे माजी संचालक प्रा, दिवाकर गमे यांना पुण्यात बोलावून, आपली व्यथा बोलावुन दाखविली.आणि आता प्रतिक्षेची मर्यादा संपलेली आहे.त्यामुळे निराश होवुन, जिवाचे बरेवाईट करावे, असा विचार मनात येतोय, ही व्यथा बोलुन दाखविली,
    विद्यार्थ्यांची न्याय्य बाजु असुनही, केवळ ईडब्ल्यु एस च्या १०% आरक्षणामुळे सुमारे ६०० विद्यार्थी खोळंबुन होते, उच्च न्यायालयाने सुध्दा ,ईडब्लु एस चे आरक्षण वगळुन इतरांचा निकाल जाहीर करून,नियुक्ती Depend, असा निकाल दिला. पण मंत्रालय व एमपीएससी स्तरावर काहीही होत नव्हते,
    तेंव्हा प्रा. दिवाकर गमे यांनी हा विषय मंत्री छगन भुजबळ यांचेकडे सांगीतला, त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे, मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे सचिव मा. सुमंत भांगे,यांना एमपीएससी ला शासनाचा   अहवाल तत्काळ  पाठविण्याची विनंती केली.
    त्यांना मंत्री भुजबळ साहेबांनी सुध्दा निर्देश दिले. त्यानंतर मंत्रालयात वेगाने कार्यवाही करण्यात आली. मंत्रालयातुन, उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे, निकाल जाहीर करून, नियुक्ती द्यावी, असा सकारात्मक   अहवाल पाठविण्यात आला, त्यानंतर आज एमपीएससी ने २०२० मधे पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर करून, ईडब्ल्युएस वगळता ईतर ५८५ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला.यामुळे विद्यार्थ्यांमधे आनंद झाला. या विद्यार्थ्यांनी मंत्रालयात जावुन, सर्व एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचे वतीने,मा. सुमंत भांगे यांची, प्रा. गमे यांचे सोबत भेट घेवुन, त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच  त्यांनी मंत्री  छगनराव भुजबळ, सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय आणि महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांचे आभार मानले. आता शासनाच्या गृह विभागाने, तत्काळ