
अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. असं म्हणत त्यांनी ट्विटर व्हिडिओ पोस्ट करत म्हण्टलं आहे.
मुंबई : “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं वक्तव्य करुन टिकेचे धनी झालेले भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आता त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू त्वरित चूक दुरुस्त केली. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
प्रसाद लाड यांनी मागितली माफी
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. असं म्हणत त्यांनी ट्विटर व्हिडिओ पोस्ट करत म्हण्टलं आहे.
प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल काय वक्तव्य केलं?
कोकण महोत्सव या कार्यक्रमात बोलतान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. “हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली” असं प्रसाद लाड म्हणाले होते.