ड्रीम 11 मुळे कोट्याधीश झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडेंवर मोठी कारवाई, आता…

जिकंल्यानातर पिएसआय सोमनााथ झेंडे यांनी पोलिस वर्दीत असताना माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनाकडून त्यांच निलंबन करण्यात आलं आहे.

    गेल्या अनेक दिवसापासून पुण्यातील पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ झेंडे चर्चेत आहे. काही दिवसापुर्वी त्यांनी ड्रिम एलेव्हन (Dream 11 ) या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून त्याने थोडथोडके नव्हे तर तब्बल 1 कोटी रुपये जिकंले. मात्र यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोट्याधीश झालेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे (Somnath Zende) यांचे अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे.

    ‘या’ कारणामुळे झालं सोमनाथ झेंडेंच निलंबन

    पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ झेंडेंच वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्याला स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वल्ड कप मॅचवेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत करोडपती झाले.

    नेमंक प्रकरण काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका पोलीस उपनिरिक्षकही उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे सुद्धा ऑनलाईन गेमच्या मोहाला बळी पडले. त्यांनी गेल्या २-३ महिन्यांपासून तो ड्रीम इलेव्हनची टीम तयार करून  क्रिकेटमध्ये नशीब आजमावले. दरम्यान, बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात त्यांनी तीन संघ तयार करून नशीब आजमावले. यामध्ये सोमनाथचा दुसरा संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. अशाप्रकारे त्यांची टीम पहिल्या क्रमांकावर आली आणि त्यांनी 1.5 कोटी रुपये जिंकले.