साताऱ्यातील गांधी मैदानावर शनिवारी धडाडणार मनोज जरांगे यांची तोफ

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती करून राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तोफ साताऱ्यात धडाडणार आहे.

    सातारा : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्मिती करून राज्य शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची तोफ साताऱ्यात धडाडणार आहे. त्यांची सभा शनिवारी (दि.१८) साताऱ्यात गांधी मैदानावर होत असून, त्याचे जंगी नियोजन करण्यात आले आहे.

    मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. त्याची बैठक नुकतीच साताऱ्यात एका हॉटेलमध्ये पार पाडली. सातारा तालुक्यातील १९४ गावांचे मराठा बांधव या सभेसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. जरांगे यांचा मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा सुरू असून, सध्या ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

    मायणी मेढा येथील सभेनंतर शनिवारी (दि.१८) मनोज जरांगे यांची येथील गांधी मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा गांधी मैदानावर होणार असून, या सभेसाठी हजारो मराठा बांधव जमा होतील अशी अपेक्षा आहे. याची माहिती समन्वयक समितीचे सदस्य व ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी याची माहिती दिली.