पुणे भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना दिलासा; १७ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलेले संरक्षण कायम

या व्यवहाराखाली जावाई गिरीश चौधरींना यांनी पाच सेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आणि या सर्व व्यवहारात राज्य सरकारचा सुमारे ६१ कोटी रुपयांचा महसूल नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले म्हणून गिरीश चौधरींना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून अटक केली होती.

    मुंबई : पुणे भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari Land Scam Case) एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी (Wife) आणि या प्रकरणातील आरोपी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना उच्च न्यायालयाकडून १७ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

    एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरींना २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. त्यामुळे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले आहेत.

    या व्यवहाराखाली जावाई गिरीश चौधरींना यांनी पाच सेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आणि या सर्व व्यवहारात राज्य सरकारचा सुमारे ६१ कोटी रुपयांचा महसूल नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले म्हणून गिरीश चौधरींना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून अटक केली होती.

    एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी अटकेच्या भिती पोटी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर मंदाकिनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. सारंग कोतवाल यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने मंदाकिनी यांचे १७ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवले.