पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला अजिंक्यपद; दोन्ही गटांत पटकावले विजेतेपद

    पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये याने 19 व 17 वर्षाखालील दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला., तर मुलींच्या गटात राधिका सकपाळ हिने विजेतेपद पटकावले.

    राधिका सकपाळने मिळवला विजय

    पीवायसी क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित राधिका सकपाळने अव्वल मानांकित आनंदिता लुनावतचा 11-08, 11-07, 11-08 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले. राधिका ही अशोका विद्यालयमध्ये विज्ञान शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून भुषण ठाकुर हाय परफॉर्मन्स सेंटर येथे प्रशिक्षक भुषण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

    उपांत्य फेरीच्या सामन्यातील रुपरेषा

    याआधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित आनंदिता लुणावतने चौथ्या मानांकित सई कुलकर्णीचा 11-03, 11-13, 04-11, 11-04, 11-08 असा तर, तिसऱ्या मानांकित राधिका सकपाळने वेदांगी रेवस्करचा11-03, 11-04, 11-06 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली

    मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित नील मुळ्येने तिसऱ्या मानांकित प्रणव घोळकरचा 06-11, 13-11, 14-12, 11-08 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित श्रेयस माणकेश्वरने सहाव्या मानांकित इशान खांडेकरचा 11-09, 08-11, 11-06, 11-08 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.

    स्पर्धेतील अंितम फेरीचा निकाल: 17 वर्षांखालील मुले: घोळकर(3) 06-11, 13-11, 14-12, 11-08. ( मुली ) राधिका सकपाळ(3)वि.वि.आनंदिता लुनावत(1) 11-08, 11-07, 11-08.