संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पुणे मेट्रोची (Pune Metro) रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यामुळे लवकरच मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहे.

पुणे : पुणे मेट्रोची (Pune Metro) रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यामुळे लवकरच मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहे.

सोमवारी पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ स्थानक येथे पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार पोचली. चाचणीदरम्यान ठरलेली उद्दिष्ट पार पडले. चाचणी अत्यंत व्यवस्थित पार पडली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येतील.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, सोमवारी घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, मंगळवार पेठ व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल.