पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यासाठी होणार ‘हा’ बदल, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

  पुणे : पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पुणे मेट्रोची प्रवाशांसाठी सेवा सुरू असते. पण काही तांत्रिक कारणास्तव उद्या पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

  मेट्रो सेवा नियमितपणे सुरू राहणार 

  उद्या दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी (केवळ एक दिवसासाठी) काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी ७:०० वाजतापासून (एक तास उशिरा) सुरू होईल, ह्याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी, असे ट्वीट पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे. तर रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे.

  सप्टेंबरपासून पुन्हा वेळापत्रक जशास तसे

  लाईन १ – पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट स्थानक आणि लाईन २ – वनाझ ते रूबी हॉल मेट्रो स्थानक या मार्गावर फक्त एका दिवसासाठी हा बदल करण्यात आला आहे. परवा म्हणजे ११ सप्टेंबरपासून पुन्हा वेळापत्रक जशास तसे करण्यात येणार आहे. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी.

  महाराष्ट्रभरातून येणाऱ्या गणेशभक्तांची पुण्यात गर्दी

  दरम्यान, गणपती उत्सवादरम्यान महाराष्ट्रभरातून येणाऱ्या गणेशभक्तांची पुण्यात गर्दी असते. यावेळी मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना रात्री प्रवास करण्याची सोय निर्माण होणार आहे.