
महापालिका नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत शहरात २९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी दवाखाना सुरु करणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मंजुर निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. तसेच दहा ठिकाणी पॉलिक्लिनिक सुरु करणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पुणे : महापालिका नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत शहरात २९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी दवाखाना सुरु करणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून मंजुर निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. तसेच दहा ठिकाणी पॉलिक्लिनिक सुरु करणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
केंद्र सरकारच्या योजनेतून हे आरोग्यवर्धिनी दवाखाने सुरु केले जातील. सुरवातीला मंजुर झालेल्या या दवाखान्यांसाठी निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. तसेच आणखी ९६ ठिकाणी आरोग्यवर्धिनी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्यसेवेत वाढ होणार आहे. या आरोग्यवर्धिनी दवाखान्यात एक डॉक्टर, दोन नर्स आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. या पदाची भरती करण्यासाठी महापालिकेने वॉक-इन इंटरव्ह्यू घेतले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य सेवेचे जाळे यामुळे विस्तारणार असून, या दवाखान्यासाठी जागा मिळण्यात कोणतीही अडचण नाही. एखाद्या शाळेच्या वर्गाची खोली एवढी जागाही पुरेशी असल्याचा दावाही आयुक्त विक्रम कुमार यांनी केला. पहिल्या टप्प्यातील १२ आरोग्यवर्धिनी दवाखान्यांचे काम पूर्ण झाले. उर्वरीत दवाखान्यांचे काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून ते सुरु केले जाणार आहे.