काँग्रेस कार्यकर्त्याला भरदिवसा  घातल्या गोळ्या; पुण्यात थरारक हत्याकांड

या प्रकारामुळे पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करुन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली.

    पुणे, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रभागा नगर चौकात काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षाचा तिघा अज्ञात दुचाकीस्वारांनी भर दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोळ्या घालून खून केल्याचा थरार घडला (Pune Murder). समीर मनुर (Sameer Manur) असे खून झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. मारेकऱ्यांनी 6 गोळ्या झाडत समीरला रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पाडल्याचे प्रत्यक्षदर्शनीं सांगितले. समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात समीरचा जागीच मृत्यू झाला.

    परिसरात दहशत
    या प्रकारामुळे पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करुन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा तपास करत आहे.