पुण्यात एनआयएची मोठी कारवाई, आणखी एका दहशतवाद्याला अटक! अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

पुण्यात एनआयएकडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक करण्यात आली आहे. अनेग दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता.

    पुण्यातुन एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसापासुन पसार असलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात पुणे एनआयएला (Pune NIA)  यश मिळालं आहे. पुण्यात एनआयएकडूनआणखी एका दहशतवाद्याला अटक  करण्यात आली आहे. महंमद शाहनवाज आलम (वय 31, मूळ झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असुन हा दहशतवादी  ‘शस्त्र चालवणं आणि स्फोटकांचे सराव वर्ग घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ही आठवी अटक आहे.
    ISIS मॉड्युल प्रकरणी मोठी कारवाई
    गेल्या काही दिवसात पुणे एनआयनं कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना अटक केली. महाराष्ट्रात   ISIS मॉड्युल तयार करण्याच्या प्रयत्नात हे सगळे दहशतवादी होते. सध्या अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींशी शाहनवाज आलमचा थेट संबंध होता. लपण्याचे ठिकाण शोधणे,  शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली तेव्हा आलम पसार झाला होता.

    आयएसआयएसचे सक्रिय कार्यकर्ता

    मो. इम्रान खान आणि मो. युनूस साकी यांच्यासह दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर ते आयएसआयएसचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समोर आले. पुढे एनआयएने त्यांच्यावर दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शाहनवाज आलमला पकडण्यासाठी तीन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ISIS  मॉड्युलप्रकरणी  NIA ने केलेल्या तपासात समोर आले आहे की, आरोपी व्यक्तींनी ISIS अजेंडा पुढे नेण्यासाठी देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याची योजना आखली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरांमध्ये घातपाताचा कट आखला होता.