भरधाव टेम्पोच्या धडकेत महिला ठार; लिफ्ट मागितली अन् काळाचा घाला; निघोजे येथील घटना

  Pimpri Chinchwad Accident News : दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागणे एका महिलेच्या जीवावर बेतले (Pune Pimpri Chinchwad Crime News) आहे. पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात (Pimpri Chinchwad Accident News) लिफ्ट मागणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.28) सकाळी सहाच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथील पंचरत्न हॉटेलसमोर झाला.

  महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  वर्षा संतोष बसवंते (वय-33 रा. निघोजे ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत राजेंद्र शंकर पवार (वय-40 रा. डोंगरवस्ती, निघोजे मूळ रा. हिमांतनगर, जि. नांदेड) हे जखमी झाले असून त्यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून आयशर टेम्पो एमएच 04 जे आर 8755 याच्या चालकावर 304(2), 279, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दुचाकीला दिली मागून धडक

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र पवार हे लुकान प्रा. लि. (Lucan Pvt. Ltd.) कंपनी नोकरी करतात. त्यांची नाईट ड्युटी संपल्याने ते दुचाकीवरुन (एमएच 14 जी जे 9198) घरी जात होते. त्यावेळी फोक्सवॅगन कंपनी (Volkswagen Company) समोर वर्षा बसवंते यांनी हात करून फिर्य़ादी यांच्याकडे लिफ्ट मागितली. फिर्य़ादी यांनी वर्षा यांना दुचाकीवर पाठिमागे बसवून जात होते.

  भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोची धडक

  पंचरत्न हॉटेलसमोर पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोची धडक फिर्य़ादी यांच्या दुचाकीला बसली. यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले. यात वर्षा बसवंते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर फिर्यादी राजेंद्र पवार यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.