वर्चस्ववादातून दहशत निर्माण करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी ‘असा’ शिकवला धडा…

वर्चस्ववादातून दहशत निर्माण करण्यासाठी वडारवाडीत (Pune Crime) वाहनांची तोंडफोड करणार्‍या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. टोळीचा प्रमुख अजय विटकर याच्यासह तब्बल 29 जणांना मोक्का लावण्यात आला आहे.

    पुणे : वर्चस्ववादातून दहशत निर्माण करण्यासाठी वडारवाडीत (Pune Crime) वाहनांची तोंडफोड करणार्‍या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. टोळीचा प्रमुख अजय विटकर याच्यासह तब्बल 29 जणांना मोक्का लावण्यात आला आहे. एकत्र जमत हातात कोयते, तलवारी तसेच काठ्या घेऊन टोळक्याने परिसरातील तब्बल 19 वाहनांची तोडफोड केली होती. तर गोंधळ घालून दहशत देखील माजवली होती.

    टोळीप्रमुख अजय विटकर, रुपेश उत्तम विटकर (वय.२५, रा. पांडवनगर) इस्माईल इब्राहीम शेख (वय.२०), गणेश हरीश्चंद्र धोत्रे (१९, रा. वडारवाडी), साहिल गणेश विटकर (२०), लवकुश रामाधीन चौव्हाण (२२), विजय उर्फ चपात्या हनुमंता विटकर (२१), चेतन उर्फ आण्णा राजू पवार (२२), अनिल उर्फ काळ्या हनुमंत डोंगरे (२१), विजय चंद्रकांत विटकर (१९) यांच्यासह इतर अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

    विटकर व साथीदाराने पंधरा दिवसांपुर्वी माध्यरात्री पांडवनगर येथे शिवीगाळ करत लाकडी दांडके व लोखंडी हत्याराने चारचाकी व दुचाकी अशा १९ वाहनांची तोडफोड केली होती. तर एकाला मारहाण करून गंभीर जखमी केले होते. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून दहशत निर्माण केली. संघटीतपणे गुन्हे करत होते. त्यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीवर यापुर्वी देखील मोक्का कारवाई केली होती. पण, त्या मोक्यातून ते बाहेर आले होते.

    दरम्यान, पुन्हा या आरोपींनी गुन्हे केल्याने मोक्का कारवाईचा प्रस्ताव चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानूसार आयुक्तांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले.