पुणे पोलिसांचा अनोखा नियम, आता कोयता खरेदी करणाऱ्यांना आधारकार्ड सक्ती; कोयता विक्रेत्यांसाठी नवीन नियमावली

पुणे शहरात (Pune City) कोयतेधाऱ्यांनी दहशती माजविली असून, पोलिसांना (Police) देखील या कोयतेधाऱ्यांवर आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून, आता पोलिसांनी कोयता विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आदेश दिले आहेत.

    पुणे : पुणे शहरात (Pune City) कोयतेधाऱ्यांनी दहशती माजविली असून, पोलिसांना (Police) देखील या कोयतेधाऱ्यांवर आवर कसा घालायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून, आता पोलिसांनी कोयता विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आदेश दिले आहेत. कोयता खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून आधारकार्ड घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

    कोयत्याने पुण्यात वेगळीच दहशत

    शहरात कोयत्यांची खुलेआम विक्री सुरू आहे. हे कोयते शेतीअवजार म्हणून त्याला मान्यता आहे. पण, शेतकऱ्यांचा कोयत्याने आता रक्तांचे पाट वाहू लागले आहेत. गुन्हेगारांकडून त्याचा सरास वापर केला जाऊ लागला आहे. कोयते सहजरित्या मिळत असल्याने तो खुलेआम वापरला जात आहे. या कोयत्याने पुण्यात वेगळीच दहशत माजविली आहे.

    बेकायदेशीर विक्रेत्यावरही कारवाई सुरू

    पुणेकरांसोबतच पोलिसांनी देखील त्याचा धसका घेतला आहे. कोयतेधाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने आता पोलिसांकडून बेकायदेशीर विक्रेत्यावरही कारवाई सुरू केली आहे. अल्पवयीन मुले तसेच शाळकरी मुलांकडे देखील कोयता पाहिला मिळत आहे.

    कोयते विक्रीबाबत निमय लागू

    दोन दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात टोळक्याने किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन मुलावर वार केले होते. त्यासोबतच शहरातील बोहरी आळी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करुन १३५ कोयते जप्त केले होते. अल्पवयीन मुलांनाही सहज कोयते उपलब्ध होत असल्याने आता कोयते विक्रेत्यांना कोयते विक्रीबाबत निमय लागू केले आहेत. त्यानूसार, त्यांना आधारकार्ड सक्ती व मोबाईल क्रमांक, पत्ता आणि नाव घेण्याचे आदेश दिले आहेत.