Photo Credit- Team Navrashtra
पुणे: मागील काही वर्षांपासून पुण्यासह राज्यातील काही भागात कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले करणे, दहशत माजवण्याचे काम या गॅंगकडून सुरू आहे. अनेकदा त्यांच्या विरोधात आवाज उठवूनही त्यांच्याविरोधात कठोर कारवाया झाल्याचे दिसत नाही. अशातच पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्या एका कोयत्या गँगच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरात दोन गटात भांडण सुरू होते. रत्नदीप गायकवाड यांनी तिथे जात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर निहाल सिंग याने कोयत्याने हल्ला केला. धक्कदायक म्हणजे निहाल सिंगवर यापूर्वीही पोलिसांवर हल्ले केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
हेदेखील वाचा: मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनिषा भोसले यांचा मृत्यू
या घटनेच्या निेषेधार्ह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “गृहमंत्री महोदय, पुण्यात आता गुन्हेगार पोलिसांनाही घाबरत नाहीत का? वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. हि अतिशय गंभीर घटना आहे. शहरात गुन्हेगारीने उच्छाद मांडला असून गृहखाते त्यावर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आजची ही घटना त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे.” अशी टीका सुप्रिया सुळए यांनी केली आहे.
त्याचबरोबर पुण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आंदोनलही करण्यात येत आहे. पुण्यात कोयता गॅँगची दहशत माजली आहे. दिवसा ढवळ्या लोकांवर हल्ले होत आहे. आता तर पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत या टोळक्याची मजल गेली आहे. राज्यातील महिला असुक्षित आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. फडणवीस यांत सपशेल अपयशी ठरलेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीत काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी केली आहे.
“हे चित्र मन विचलित करणारं, परंतू महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्थेची दयनीय अवस्था दाखवणारं आहे. @Dev_Fadnavis या माणसाने अजिबात पात्रता नसताना केवळ हेरगिरीसाठी गृहखात्यावर कब्जा ठेवला आहे. याची किंमत महाराष्ट्रातील जनतेला, महिलांना व पोलिसांना चुकवावी लागत आहे. फडणवीस.. थोडी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या ! ” असे ट्विट करत थेट देवेंद्र फडणवीसांचा राजीमाना मागितला आहे.
हेदेखील वाचा: पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे चेहरा सतत चिकट होतो? मग वापरून पहा ‘हे’ फेसमास्क






