ताप, थंडी खोकल्याने पुणेकर बेजार; वायु प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजारांत वाढ

पुणे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातच सध्या थंडी, ताप आणि खोकल्याच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी आणि वायु प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजार वाढले असून, योग्य आहार आणि विहार केल्यास लवकर बरे व्हाल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

  पुणे : पुणे शहरासह संपुर्ण जिल्ह्यातच सध्या थंडी, ताप आणि खोकल्याच्या रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. कडाक्याची थंडी आणि वायु प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजार वाढले असून, योग्य आहार आणि विहार केल्यास लवकर बरे व्हाल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

  दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर आतषबाजीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड ढासळली होती. अक्षरशः श्वास घेण्यास अडचण निर्माण होईल, अशी स्थिती होती. त्यात पहाटेच्या वेळी पडणाऱ्या कडाक्याचे थंडीने भर टाकल्यामुळे विषाणूजन्य आजारांची वाढ झाली आहे.

  काहीसे संसर्गजन्य असलेल्या या आजारामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांत श्वसनाशी निगडित समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण आहे. कोणतेही घाबरून जाण्याचे कारण नसून, आजारांसाठी लक्षणांनूसार उपचार घेणे गरजेचे आहे.

  ही घ्या काळजी..

  – लक्षणांनूसार उपचार घेणे गरजेचे

  – दम्याच्या रुग्णांनी काळजी घ्यावी

  – वायु प्रदूषण कमी होईपर्यंत पहाटे थंडीत मॉर्निंग वॉक करणे टाळा

  – भरपूर पाणी प्या, योग्य आहार घ्या

  —हे लक्षात ठेवा..

  – विषाणूजन्य आजार असला तरी आठवड्यात बरा होतो

  – विनाकारण घाबरून जाण्याचे कारण नाही

  – लक्षणे तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

  हवामान बदलामुळे शहरात श्वसनाशी निगडित विषाणूजन्य आजारांची वाढ झाली आहे. या काळात दम्याच्या रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

  - डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

  प्रदूषण वाढल्यामुळे दम्याच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ बाहेर पडणे थांबवा. भरपूर पाणी साह्यआहार घेणे गरजेचे आहे.

  - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक