चक्क तीन लाखात बाळाची खरेदी; शिक्षिकेसह तीन जणांना अटक

या प्रकरणात सहभागी असलेल्या शिक्षिका महिलेच्या घरी दोन मुलं आणि पती असे चार सदस्य होते. यापैकी मोठा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नाही. तर दुसऱ्या मुलाने काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे ती महिला एकटी पडली होती. दारुड्या मुलाकडे म्हातारपणी आपला निभाव लागणार नाही, या चिंतेत ती होती.

    नागपूर -म्हातारपणी आधार मिळावा या उद्देशाने एका शिक्षिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांच्या मार्फत तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. तक्रात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तापसाअंती तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोन महिला एका रुग्णालयातील परिचारिका आहेत.

    या प्रकरणात सहभागी असलेल्या शिक्षिका महिलेच्या घरी दोन मुलं आणि पती असे चार सदस्य होते. यापैकी मोठा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नाही. तर दुसऱ्या मुलाने काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे ती महिला एकटी पडली होती. दारुड्या मुलाकडे म्हातारपणी आपला निभाव लागणार नाही, या चिंतेत ती होती. त्यामुळे महिलेने एक मूल दत्तक घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी (आयव्हीएफ) टेस्ट ट्यूब बेबीसाठी सुद्धा प्रयत्न केले. मात्र त्यातही यश मिळाले नाही.