PYC-Vijay Pusalkar Premier Cricket League tournament, Harshal Gandre became the most expensive player in the auction
PYC-Vijay Pusalkar Premier Cricket League tournament, Harshal Gandre became the most expensive player in the auction

  पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने  ९ ते १६ डिसेंबर दरम्यान आयाेजित दहाव्या पीवायसी- विजय पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात साठे – बोथरा जॅगवार्स संघाचा हर्षल गंद्रे (8100 पॉईंट्स) हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे.

  या स्पर्धेत 16 संघाचा समावेश
  खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पीवायसीच्या कम्युनिटी हॉलमध्ये नुकतीच पार पडली. स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. पी वाय सी क्लबच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत ए अँड ए शार्क्स, बेलवलकर बॉबकॅट्स,  जीएम टायफून्स, कोतवाल बदामीकर युनिकॉर्नस, लाईफसायकल स्नो लेपर्डस, नॉक99 पुणेरी बाप्पा, राहुल वेअर वुल्व्हस, ओव्हनफ्रेश टस्कर्स, पंडित जावडेकर डॉल्फिन्स, रावेतकर बुल्स, रॉयल स्टॅलियन्स, सैनुमेरो चिताज, स्नो लेपर्डस, स्वोजस टायगर्स, ट्रूस्पेस जॅगवॉर्स, साठे-बोथरा जॅगवार्स  हे 16 संघाचा समावेश आहे.

  सुजनील यांचादेखील पाठिंबा

  एकूण 210 खेळाडूंच्या सहभागातून घेण्यात आलेल्या लिलावात या वेळी हर्षल गंद्रे शिवाय रवी कासटला ट्रूस्पेस नाईट्सने 5300 पॉईंट्सची बोली लावली. प्रसाद जाधवला ए अँड ए शार्क्स संघाने 5000 पॉईंट्सला खरेदी केले.  अभिषेक ताम्हाणे(स्वोजस टायगर्स), अंकुश जाधव(ए अँड ए शार्क्स), अश्विन शहा(जीएम टायफून्स), अक्षय ओक(लाईफसायकल स्नो लेपर्डस), हर्षा जैन(लायन्स), श्रीनिवास चाफळकर(ओव्हनफ्रेश टस्कर्स), कर्णा मेहता(रावेतकर बुल्स), तन्मय चोभे (रॉयल स्टॅलियन्स) यांना प्रत्येकी 4500 पॉईंट्सना घेण्यात आले. या स्पर्धेला होडेक गेली सहा वर्षे सहप्रायोजित करीत असून बेलवलकर हौसिंग लिमिटेड, चाफळकर करंदीकर डेव्हलपर्स, सुप्रिम कन्स्ट्रो प्रॉडक्टस, नेवितास जेनसेट प्रायव्हेट लिमिटेड, सुजनील यांचादेखील पाठिंबा लाभला आहे.

  सहभागी संघांच्या जर्सीचे अनावरण

  सहभागी संघांच्या जर्सीचे अनावरण पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे सचिव  सारंग लागू, आणि पुसाळकर ग्रुपचे रोहन पुसाळकर, एमसीएचे माजी अध्यक्ष विकास काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, निरंजन गोडबोले, शिरीष आपटे, विकास अचलकर, सिद्धार्थ निवसरकर, नंदन डोंगरे, शिरीष साठे व सिद्दार्थ दाते आदी मान्यवर उपस्थित होते.