Queen's necklace attracts tourists! The beauty of the overflowing Utavali Dam cannot be missed

उतावळी धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात. पण या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर (basalt rock) बांधण्यात आला आहे. मध्यम प्रकल्प म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ३७०.५० दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

    बुलढाणा : पावसाळ्यात अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळाचा नजारा खुलून निघतो. पाऊस कोसळला की, पाण्याने भरलेली धरणे ही पर्यटकांच्या डोळ्यात भरतात. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील (Mehkar Taluka) डोंगर दऱ्यांच्या खाली देऊळगाव साकरशा (Deulgaon Sakarsha) गावाजवळ असलेले उतावळी नदीवरील उतावळी धरण (utawali dam) “क्वीन्स नेकलेस ” (Queen’s Necklace) म्हणून परिचित आहे. ते यांच्या सांडव्याच्या रचनेवरून अगदी अर्धगोलाकार असलेला हा सांडवा आणि त्यावरून वाहणार स्वच्छ पाणी यामुळे एखाद्या महिलेच्या गळ्यातील मोत्यांची माळ वाटावी, तसा दिसणाऱ्या या सांडव्याच्या (Sandva) आकारावरून या धरणाला हे नाव सुद्धा शोभून दिसते. आता यावर्षी हे धरणं जुलै महिन्यातच पूर्ण भरले आहे.

    उतावळी धरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः धरणाचे सांडवे हे मातीत खोल खोदून पक्का पाया तयार करून बांधले जातात. पण या धरणाचा सांडवा हा बेसॉल्ट खडकावर (basalt rock) बांधण्यात आला आहे. मध्यम प्रकल्प म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची पाणी साठवून ठेवण्याची मोठी म्हणजे ३७०.५० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. विशाल अशा डोंगरदऱ्यात हे धरण बांधायला सुरुवात झाली ती १९९७ साली तर या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं ते २००४ साली.

    सध्या हे धरण शंभर टक्के भरल्याने आता सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने या धरणाचं रूप डोळ्यात साठवण्याकरिता पर्यटक गर्दी करू लागले आहे. धरण आणि पाणी म्हटलं की रिस्क पण आलीच, म्हणून या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणं ही महत्वाची आहे. कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी, पर्यटनाला जाताना योग्य ती खबरदारी घेऊन धरणाच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन ही येथील स्थानिक नागरिक करतानाही दिसतात.