खासदार कपिल पाटील यांचा नाव न घेता शरद पवारांना सवाल?

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना सवाल केला आहे.

    कल्याण : केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांची कल्याणमध्ये आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता त्यांना सवाल केला आहे. आज शरद पवार हे भिवंडी मतदार संघात उपस्थित राहणार आहेत. याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कपिल पाटील हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, दहा वर्षे कृषी मंत्री होते. ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी काय केले. राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील शेतकऱ्यांसाठी काही केले असते असा सवाल केंद्रीय पंचायत राजमती कपिल पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांना केला आहे.

    पुढे ते म्हणाले की, ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेचे आयोजन १५ मे रोजी करण्यात आले आहे. या सभेची माहिती देताना खासदार पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला आहे. खासदार पाटील यांनी सांगितले की, आज आपल्याला नाशिक पुण्यावरुन भाजीपाला येतो. दुध आपल्याला बाहेरुन येते, ते आपल्याला आणावे लागले नसते असे कपिल पाटील म्हणाले.

    पुढे कपिल पाटील म्हणाले की, ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या ही राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी २५ टक्के आहे. या जिल्ह्यातील पैसे दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्याला लागणारे दूध हे नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापूर हून येते. इथे आपल्या गोव्या नाक्यावर मदर डेअरी आहे. मदर डेअरीत दूध बारामतीचे येते. ही मदर डेअरी काढली. आत्महत्या शेतकऱ्यांकडून दूध घेऊन याठिकाणी विकायचे हा निर्णय मी घेतलेला नाही असे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.