जमीन मोजणीच्या वादातून दोन गटात राडा; १७ जणांविरोधात गुन्हा दाखल

श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून कुरुमकर व माने गटात राडा झाला आहे या प्रकरणी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रविण कुरुमकर, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने यांच्या गटाच्या १७ जणांविरोधात मारामारी सरकारी कामात अडथळा अॅट्रोसिटी विविध कलमान्वये, गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

  श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे जमिनीच्या मोजणीच्या वादातून कुरुमकर व माने गटात राडा झाला आहे या प्रकरणी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रविण कुरुमकर, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने यांच्या गटाच्या १७ जणांविरोधात मारामारी सरकारी कामात अडथळा अॅट्रोसिटी विविध कलमान्वये, गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार लिंपणगाव येथील आशोक जयवंत ओहोळ यांनी गट नं. २३६ मध्ये ४० आर शेतजमीन २५ ऑगस्ट २०२१ रोजी बापू माने यांना विकली होती. या जमिनीच्या शेजारी प्रविण सोमानराव कुरुमकर यांची जमीन असून या दोघांची जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याने या शेतजमिनीची मोजणी करून मानेंच्या ताब्यात देण्यासाठी शासकीय मोजणी बोलाविली होती.

  मंगळवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली असता, प्रविण कुरुमकर, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, शुभांगी कुरुमकर, मनिषा भोंडवे, संभाजी सूर्यवंशी, विजय कुरूमकर, उमेश वेताळ, मयुर चव्हाण, हनुमंत रेवगे, निता पंधरकर यांनी मोजणी ठिकाणी येऊन अशोक ओहोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत बरोबर असणारे बापु माने आणि त्यांचा मुलगा उदय माने यांना देखील जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच उदय माने याला खुरप्याने डोक्यात मारुन त्यास गंभीर जखमी केले.

  त्याला वाचविण्यासाठी ओहोळ आणि बापू माने हे गेले असता सर्वांनी या तिघांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. पुन्हा जमिनीचा ताबा घेण्यासाठी आल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रकरणी लिंपणगाव येथील १३ जणांवर अॅट्रोसिटी कलमान्वये श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  चार जणांनी मज्जाव केल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचे गोरक्ष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी संतोष भोंडवे, सागर भोंडवे यांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे.

  दरम्यान शेतीच्या बाबत न्यायालयात दावा दाखल असताना गावातील अशोक ओहोळ, भगवान ओहोळ , रामराव आहोळ यांनी २०२१ मध्ये भोंडवे यांच्या आजीने विकत घेतलेले ७९ गुंठे शेतीची बापु माने याला विकत दिली. या शेतीचा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल असताना शेतीच्या तव्यावरून बापु माने आणि भोंडवे यांच्यात वाद चालु असताना दि.२ ऑगस्ट रोजी शेतातील कपाशी खुरपत असताना बापु माने व भुमी अभिलेख श्रीगोंदा येथील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच बापु माने सोबत असलेल प्रदीप सुदाम खामगळ, उयद माने, हनुमंत माने तसेच सुशिल शिंदे यांच्यासह इतर ५ ते ६ जणांनी एकत्र जमुन जेसीबी मशीन व टॅक्टर घेऊन येत शेत जमीनीची मोजणी करण्यासाठी आल्याने त्यांना भोंडवे यांनी शेतीचा श्रीगोंदा न्यायालयात दावा दाखल असुन त्याचा निकाल लागलेला नाही असे सांगीतले असता बापु माने, उदय माने, प्रदीप खामगळ, सुशिल शिंदे यांनी सदरचे शेत जमीन ही काय तुमच्या बापाची आहे काय? सदर शेताची मोजणी आजची आजच झाली पाहीजे, असे म्हणून शिवीगाळ तसेच जबरी मारहाण केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.