राहुल आवाडे निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम; हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता

महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळं राहुल आवाडे यांचा पत्ता कट झालाय. मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

    कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यांनी महायुतीला बाहेरून पाठींबा दिला होता. दरम्यान, महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळं राहुल आवाडे यांचा पत्ता कट झालाय. मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.

    दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी त्यांची आज भेट घेतली. त्यामुळं राहुल आवाडे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं हातकणंगले मतदारसंघात महायुती कडून खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी कडून राहुल आवाडे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

    ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी घेतली भेट

    दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे राहुल आवाडे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी पक्षाकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीकडून राहुल आवाडे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.