राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; प्रकृतीची विचारपूस

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली असून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून चांगली गाजत आहे. त्यातच त्यांनी प्रकृतीची विचारणा करण्यासाठी फोन केल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ट्विट केले आहे.

    मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीमधून (MVA) फारक घेत भाजपला (BJP) सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन झाले. त्यावरून राज्यात मोठी उलथापालथ झाली. त्यातच पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने (ED) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांची १०० दिवसांनी सुटका केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने ईडीला झापले.

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली असून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून चांगली गाजत आहे. त्यातच त्यांनी प्रकृतीची विचारणा करण्यासाठी फोन केल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ट्विट केले आहे.

    भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.., असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.