उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही?; राहुल गांधी यांचा सवाल

मूठभर उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली.

    धुळे : मूठभर उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करणारे भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली.

    राहुल यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ बुधवारी धुळे शहरात पोहोचली. यादरम्यान धुळे शहरातील आग्रा रोडवरून त्यांचा भव्य रोड शो झाला. त्यानंतर त्यांनी येथील शिवाजी महाराज चौकात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी गांधी यांनी ‘देशातील केवळ 22 उद्योगपतींच्या हातात 90 टक्के संपत्ती आहे. तर, १० टक्के दलित, आदिवासी, मुस्लिम मागासवर्गीय यांच्या हातात केवळ तीन टक्केसुद्धा संपत्ती नाही, असा दावा केला. तसेच, महागाई आणि बेरोजगारीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

    न्याय यात्रेच्या सभेचे पोस्टर लाँच

    राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची रविवारी 17 मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली असून, या सभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग बुधवारी येथे करण्यात आले. मुंबईत 17 मार्चला शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर लॉन्च करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये शिवतीर्थावर होणार न्याय गर्जना, न्यायासाठी लढायचं गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं, आठवणीने यायचं अशा आशयाचा मजकूर आहे.