rahul gandhi

जनतेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारत जोडो यात्रेमध्ये मला अनेक गोष्टींची जाणीव झाली आहे. जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी यात्रेसारखा पर्याय नाही. आमची यात्रा रोखून दाखवा, असं आव्हान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे.

    अकोला: भाजपचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या अकोल्यात आली आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वांचं पोट भरणारा शेतकरी संकटात आहे. त्यावर कुणीही बोलत नाही.

    जनतेच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पैशांचं आमिष देत विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारत जोडो यात्रेमध्ये मला अनेक गोष्टींची जाणीव झाली आहे. जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी, मांडण्यासाठी यात्रेसारखा पर्याय नाही. भारत जोडो यात्रेतून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांनी ही यात्रा रोखावी, असेही राहुल गांधी म्हणाले. आमची यात्रा रोखून दाखवा, असं आव्हान त्यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफीनाम्यावर सही करण्याचं कारण काय ? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांनी सावरकरांचा माफीनामाही पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवला.

    सध्या देशापुढे दोन मोठ्या समस्या आहेत. देशात युवकांना रोजगार मिळत नाही. दुसरी समस्या ही आहे की सध्या शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळत नाही. शेतकरी वेळेला पीक विमा भरतात मात्र, त्यांना पैसे मिळत नसल्याचे गांधी यावेळी म्हणाले.