राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात; तब्बल १६ दिवसांचा हा दौरा

राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी जीएसटी आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याबाबत व्युहरचना आखण्यात आली. तसेच, राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील दौरा होणार आहे असून त्याबाबतही चर्चा करण्यात आली.

    मुंबई : महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसमध्ये नवे चैतन्य आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Tour) करणार आहेत. तब्बल १६ दिवसांचा हा दौरा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

    राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी जीएसटी (GST) आणि महागाईच्या (Inflation) मुद्द्यावर चर्चा झाली असून महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याबाबत व्युहरचना आखण्यात आली. तसेच, राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील दौरा होणार आहे असून त्याबाबतही चर्चा करण्यात आली. या दौऱ्याचे नियोजन कसे असावे, याबाबत विचारविनिमय करण्यात येत आहे.

    भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात आक्रमक पद्धतीने उतरणार आहे. त्यासाठीच हा राहुल गांधी यांचा दौरा आहे. राहुल गांधी यांचा राज्यात हा सोळा दिवसांचा दौरा आहे. महाराष्ट्रातील समन्वयाची जबाबदारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी, अशोक चव्हाण, नाना पटोले, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.