भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधींचे शारीरिक वजन घटले व राजकीय वजन कमी झाले, उदय सामंत यांची टीका

यात्रेतील एका सभेत सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींनी केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच यानिमित्ताने गांधी, नेहरु व सावरकर यांच्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळं सत्ताधारांच्या पोटात दुखत आहे, असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल (Nana patole) यांनी म्हटलं आहे.

    मुंबई – सध्या काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. ही यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या यात्रेतील एका सभेत सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींनी केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच यानिमित्ताने गांधी, नेहरु व सावरकर यांच्यावर सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तर भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळं सत्ताधारांच्या पोटात दुखत आहे, असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल (Nana patole) यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी भारत जोडो यात्रेवर कडाडून टिका केली आहे.

    दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते, आमदार व मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर टिका केली आहे. भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधींचे शारीरिक वजन घटले आहे. आणि राजकीय वजन देखील कमी झाले आहे, असा टोला सामंत यांनी लगावला आहे, तर भारत जोडो यात्रा नसून ही भारत तोडो यात्रा असल्याची टिका केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर केली आहे.