राहुल गांधींनी घेतले गजानन महाराज यांचे दर्शन, सभेला सुरुवात

भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता बुलडाण्यातील शेगाव येथे दाखल झाली आहे. तत्पूर्वी राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी मनसे आक्रमक होत मनसेनं आदोलन केल. तसेच राहुल गांधींनी काही मनसे पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. दरम्यान, राहुल गांधींनी शेगावात गेल्यानंतर प्रथम प्रसिद्ध गजानन महाराजांच्या मंदिरात जात गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.

    शेगाव – काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता बुलडाण्यातील शेगाव येथे दाखल झाली आहे. तत्पूर्वी राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी मनसे आक्रमक होत मनसेनं आदोलन केल. तसेच राहुल गांधींनी काही मनसे पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. दरम्यान, राहुल गांधींनी शेगावात गेल्यानंतर प्रथम प्रसिद्ध गजानन महाराजांच्या मंदिरात जात गजानन महाराज यांचे दर्शन घेतले.

    त्यानंतर सभेच्या ठिकाणी आगेकूच केली. दरम्यान, आता सभेला सुरुवात झाली असून, हजारो काँग्रेस कार्यकर्ते सभेला हजर झाले आहेत. सभेत कोणताही दंगा किंवा सभेला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सभा उधळून लावण्याचा इशारा मनसेनं दिला आहे, त्यामुळं कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. सावरकारांचा मुद्दा तापला असताना यावर राहुल गांधी काही उत्तर देणार का, हे पाहवे लागेल. व्यासपीठावर बाळासाहेब थोरा, नाना पटोले, संजय निरुपम, यशोमती ठाकूर आदी उपस्थित आहेत.