
श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Shrigonda Market Committee Election) माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांना संपविण्यासाठी निघालेले पाचपुते नागवडे एकत्रित येऊन निवडणूक केली. मात्र, या निवडणुकीत पाचपुते-नागवडे यांना चारी मुंड्या चीत करत राहुल जगताप यांनी पाचपुते-नागवडे यांच्या भारतीय बाजार समितीच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावून बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला मात्र गड आला पण सिंह गेला.
श्रीगोंदा : श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या (Shrigonda Market Committee Election) माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांना संपविण्यासाठी निघालेले पाचपुते नागवडे एकत्रित येऊन निवडणूक केली. मात्र, या निवडणुकीत पाचपुते-नागवडे यांना चारी मुंड्या चीत करत राहुल जगताप यांनी पाचपुते-नागवडे यांच्या भारतीय बाजार समितीच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावून बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला मात्र गड आला पण सिंह गेला.
श्रीगोंदा तालुक्यातील खरेदी विक्री संघाची दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप व राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी डावपेच टाकत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. म्हणून जगताप यांना संपविण्यासाठी श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित पॅनल केला होता. तर राहुल जगताप व बाळासाहेब नाहटा यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला होता. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होऊन दोन्हीही पॅनल च्या नेत्यांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन करण्यात आले होते.
आज झालेल्या श्रीगोंदा बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने पाचपुते नागवडे यांच्या पॅनलच्या चारी मुंड्या चीत करत 11 जागा जिंकून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तर पाचपुते नागवडे यांच्या गटाला अवघ्या 7 जागा मिळवून समाधान मानावे लागले.
सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघात बापूसाहेब जगताप, अजित जामदार, नितीन डुबल, दीपक पाटील भोसले, भास्कर वागस्कर इतर मागास प्रवर्गात प्रविण उर्फ अतुल लोखंडे, भटक्या विमुक्तमध्ये दत्तात्रय गावडे, महिला प्रवर्ग मनीषा मगर, अंजली रोडे, तर ग्रामपंचायत मतदारसंघात साजन पाचपुते, हमाल मापडी मतदारसंघात किसन सिदनकर हे जगताप गटाचे विजयी उमेदवार तर पाचपुते-नागवडे सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघात दत्तात्रय पानसरे, रोहिदास पवार, तर ग्रामपंचायत मतदारसंघात महेश दरेकर, ग्रामपंचायत दुर्बल घटक मतदारसंघात लक्ष्मण नलगे, ग्रामपंचायत अनुसूचित मतदारसंघात प्रशांत ओगले आणि व्यापारी मतदारसंघात लौकिक मेहता, आदिक वांगणे आदी उमेदवार विजयी झाले.
जगताप यांच्या गटाचा गड आला पण सिंह गेला?
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनलचा गड आला पण सिंह गेला. मात्र, बाजार समितीच्या निवडणुकीत राहुल जगताप यांना मदत करणारे बाळासाहेब नाहटा यांचे चिरंजीव मितेश नाहटा यांना पराभव पत्करावा लागला.
सभापतिपदामुळे केला पराभव?
बाजार समितीच्या निवडणुकीत राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचे चिरंजीव निवडून आल्यास जगताप गटाकडून सभापतिपदावर विराजमान होतील म्हणूनच विरोधी पक्षासह पक्षांतर्गत काही कार्यकर्त्यांनी नाहटा यांना टार्गेट करून मितेश नाहटा यांचा पराभव केला.