राहुल शेवाळे किती वेळा दुबई, पाकिस्तान, कराचीला गेले आहेत तपासा? दुबईच्या तरुणीचे गंभीर आरोप

तरुणी म्हणाली, राहुल शेवाळे हेच किती वेळेस दुबईला आले. दुबईहून नंतर ते कोठे-कोठे गेले? पाकिस्तानला किती वेळेस गेले? राहुल शेवाळेंचे पाकिस्तानातील कराचीत किती हॉटेल्स, रिअल इस्टेटच्या साईट्स तसेच राहुल शेवाळेंचे कराचीत कोणकोणते व्यवसाय आहेत, याचा एनआयएने सखोल तपास करावा. यातून सर्व माहिती समोर येईल.

  मुंबई – खासदार राहुल शेवाळे किती वेळा दुबई, पाकिस्तान, कराचीला गेले आहेत तपासा? राहुल शेवाळेंचे दुबई, कराचीत किती हॉटेल्स, रिअल इस्टेट व कोणकोणते व्यवसाय आहेत, हेही तपासा, असे खुले आव्हान आज पीडित तरुणीने दिले.

  राहुल शेवाळेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने स्वत:चे व्हिडिओ ट्विट करत बलात्कार प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली. तसेच, राहुल शेवाळेच किती वेळा पाकिस्तान, दुबईला गेले याची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली.

  व्हिडिओमध्ये तरुणी म्हणाली, खासदार राहुल शेवाळेंनी मला लग्नाचे खोटे वचन देत माझ्यावर अत्याचार केला. माझा मानसिक छळ केला. नंतर उलट माझ्याविरोधातच दुबईत खोट्या तक्रारी दाखल केल्या. राहुल शेवाळेंविरोधात मी साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी याप्रकरणी शेवाळेंविरोधात गुन्ह्याची नोंद केलेली नाही.

  तरुणी म्हणाली, आता उलट राहुल शेवाळेंनीच माझ्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. माझे पाकिस्तान, डी गँग आणि दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी केलाय. मी माझा पासपोर्ट एनआयएला द्यायला तयार आहे. त्यांनी या पासपोर्टचा तपास करून मी एकदा तरी पाकिस्तानला गेले होते की नाही, हे सांगावे. मी एकदाही पाकिस्तानला गेलेले नाही. मात्र स्वत:ची चूक झाकण्यासाठी राहुल शेवाळे माझ्याविरोधात खोटे आरोप करत आहे.

  तरुणी म्हणाली, राहुल शेवाळे हेच किती वेळेस दुबईला आले. दुबईहून नंतर ते कोठे-कोठे गेले? पाकिस्तानला किती वेळेस गेले? राहुल शेवाळेंचे पाकिस्तानातील कराचीत किती हॉटेल्स, रिअल इस्टेटच्या साईट्स तसेच राहुल शेवाळेंचे कराचीत कोणकोणते व्यवसाय आहेत, याचा एनआयएने सखोल तपास करावा. यातून सर्व माहिती समोर येईल.

  तरुणी म्हणाली, राहुल शेवाळेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्याविरोधात दुबईत दोन खोट्या केसेस दाखल केल्या. राहुल शेवाळे आणि मी दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो. यावेळी मला राहुल शेवाळेंनी अनेकदा दारू पिऊन जबर मारहाण केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार केला. मात्र, नंतर मी लग्नाचे नाव काढताच राहुल शेवाळे मला धमकावत होते.

  तरुणी म्हणाली, दुबईत माझा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरळीच चालू होता. मात्र, आता राहुल शेवाळेंमुळे माझे करिअर, वैयक्तिक आयुष्य यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. माझ्या कुटुंबालाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मला न्याय हवा आहे.