Raid on Matka hideout in Yavatmal, seized eight persons along with thousands of valuables

पोलिसांनी या धाडसत्रात एकूण नऊ हजार ६०० रुपये रोख आणि ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल असा ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विलास चव्हाण (३०) यास विचारणा केली असता त्याने भरतलाल बडोदकडे अडीचशे रुपये मजुरीने काम करीत असल्याचे सांगितले.

    यवतमाळ : शहरातील विविध भागात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर (Varali Matka Adda) पोलिसांनी धाडसत्र राबवून आठ बहादारांना अटक केली असून ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज ८ ऑगष्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केली.

    विलास चव्हाण (३०) (रा. जोडमोहा) याच्याकडून १८० रुपयांचे साहित्य, पंचशील राजू साबळे (२२) रा. वडगाव याच्याकडून रोख ९२० रुपये व सात हजारांचा मोबाईल, मिथुन जाधव (रा. वडगाव) याच्याकडून ९८० रोख व सात हजारांचा मोबाइल, अभिजीत बडोद (३०) (रा. शारदा चौक) याच्याकडून १९५० रुपये रोख, २० हजारांचे दोन मोबाइल, सागर बडोद (२५) (रा. शारदा चौक) याच्याकडून १११० रुपये रोख, गोपाल लाजेवार (३५) (रा. रुपनगर) याच्याकडून रोख १०५० रुपये, लक्ष्मण अतकरे (५४) (रा. उमरसरा) याच्याकडून ८५० रुपये रोख व १२०० चा मोबाइल, हेमंत राठोड (२४) (रा. वडगाव) याच्याकडून रोख ८९० रुपये जप्त करण्यात आले.

    पोलिसांनी या धाडसत्रात एकूण नऊ हजार ६०० रुपये रोख आणि ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल असा ४२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विलास चव्हाण (३०) यास विचारणा केली असता त्याने भरतलाल बडोदकडे अडीचशे रुपये मजुरीने काम करीत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई एपीआय वनारे, विनोद राठोड, महेश नाईक, धनंजय श्रीरामे यांनी केली.