Raid on the fake bidi factory! 2 Crore 80 Lakh transaction on the basis of fake label was avoided

बिडी व्यवहारात सीजे हे ब्रांड खूप मोठे आहे. संपूर्ण भारत देशात विविध राज्यांत या कंपनीच्या विविध ब्रांडच्या बिड्यांची विक्री करण्यात येते. आमगाव तालुक्यात बनावट बंडल आणि लेबल लावून मध्यप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा राज्यांसह देशाच्या विविध भागांत बिड्यांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार सीजे टोबॅको प्रोडक्टस कंपनीचे व्यवस्थापक यांनी आमगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

    गोंदिया : सीजे पटेल टोबॅको प्रोडक्ट कंपनीच्या (CJ Patel Tobacco Product Company) मनोहर फोटो बिडी (Manohar photo bidi), २७ नंबर स्पेशल बिडी, ४३ नंबर ब्रांड बिडी आणि मंकी बॉय बंदरी बिडीचे बनावट कट्टे (Fake Bidi Bracelets) आणि लेबल आमगाव पोलिसांनी (Amgaon Police) छापामार कारवाई करत बिरसी (Birsi) येथून १ ऑगस्टच्या रात्री छापामार कारवाई करत पकडले. सीजे कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या स्टिकर, लेबलच्या आधारे २ कोटी ८० लाख रुपयांचा व्यवहार करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुनील बोरकर (Sunil Borkar ) रा. कुंभारटोली ( Kumbharitola ) असे आहे.

    बिडी व्यवहारात सीजे हे ब्रांड (CJ brand) खूप मोठे आहे. संपूर्ण भारत देशात विविध राज्यांत या कंपनीच्या विविध ब्रांडच्या बिड्यांची विक्री करण्यात येते. आमगाव तालुक्यात बनावट बंडल आणि लेबल लावून मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), हरियाणा (Haryana )राज्यांसह देशाच्या विविध भागांत बिड्यांची विक्री (Sale of bidi) करण्यात येत असल्याची तक्रार सीजे टोबॅको प्रोडक्टस कंपनीचे व्यवस्थापक यांनी आमगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

    बनावट बिड्या तयार करून विक्री होत असल्याने शासकीय महसूल देखील बुड़त असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावरून आमगाव पोलिसांनी बिरसी येथे १ ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास छापामार कारवाई केली. बिरसी येथील भाड्याच्या घरात सुरू असलेला कारखाना आणि गोदामात बनावट लेबल, स्टीकर, होलोग्राम आदी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या बनावट लेबलच्या माध्यमातून २ कोटी ८० लाख रुपये किमतीच्या बिड्यांची विक्री करता येवू शकत होती. आरोपी कुंभारटोली येथील असून त्याचे नाव सुनील बोरकर असे आहे.

    कमी किमतीत विक्री

    सीजे टोबॅको प्रोडक्टस कंपनीच्या बिड्यांच्या पुड्याची किंमत ३७० रुपये आहे. मात्र, बनावट बिड्यांचा पुडा २०० ते २५० रुपयांना विक्री करण्यात येत होता. परिणामी कंपनीचे प्रचंड नुकसान होत होते. खपत देखील कमी झाल्यामुळे शासनाचा महसूल (Revenue of Govt) देखील बुडत होता. आरोपीविरोधात कलम ४२०, ४६५ सह कलम ५१, ५३, ६३, ६४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उप निरीक्षक प्रतीभा पाथोडे करत आहेत.