संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शहरात घरगुती वापरासाठी वीज चोरी होत असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर आता व्यावसायिक कामासाठीही विजेची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

    नाशिक : शहरात घरगुती वापरासाठी वीज चोरी होत असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर आता व्यावसायिक कामासाठीही विजेची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सातपूर परिसरात फळांच्या गोडाऊनसह अॅक्वा युनिटसाठी राजरोस वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणने टाकलेल्या छाप्यात पुढे आहे.

    दोन घटनांमध्ये तब्बल ७० हजार २८८ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून, यामुळे वीज कंपनीचे सुमारे साडे नऊ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे सातपूर पोलीसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

    ठाणे येथील भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी पाथर्डी शिवारात छापेमारी करत वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरणचे मुख्यालय असलेल्या नाशिकरोड कार्यालयाने छापेमारी सुरू केली आहे. या पथकांनी सातपूर भागात छापे टाकून दोन व्यावसायिक वीज चोरीचे उघडकीस आणले आहेत.

    पिंपळगाव बहुला येथील साई तीर्थ अॅक्वा युनिटमध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, छापा टाकला असता येथे तब्बल १२ हजार ८ युनिटची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.