रायगड पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याने अलिबाग (Alibaug) येथील आपल्या पोलीस कर्मचारी निवासस्थानात विष (Poison) घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

    अलिबाग : पोलीस दलातील कर्मचाऱ्याने अलिबाग (Alibaug) येथील आपल्या पोलीस कर्मचारी निवासस्थानात विष (Poison) घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राजू पाटील (Raju Patil) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    रायगड पोलिसांच्या (Raigad Police) पोलीस निवासस्थानात राजू पाटील हे पोलीस कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात राहत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याने विष प्राशन केले. ही माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.