फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई; विनातिकीट प्रवास करणाऱ्या 304 जणांकडून ‘इतका’ दंड वसूल

रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांमधून विनातिकीट (Without Ticket Passengers) प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने रेल्वे वाणिज्य विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू केली. गेल्या दीड महिन्यात 304 फुकट्या प्रवाशांकडून 91 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

    धाराशिव : रेल्वेच्या पॅसेंजर गाड्यांमधून विनातिकीट (Without Ticket Passengers) प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने रेल्वे वाणिज्य विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू केली. गेल्या दीड महिन्यात 304 फुकट्या प्रवाशांकडून 91 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

    अकोला पूर्णा या रेल्वे मार्गावर नियमित पॅसेंजर रेल्वे धावते. तथापि या महिन्यात रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आली. यामुळे रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्या अकोला ते पूर्णा मार्गादरम्यानच्या प्रवाशी रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध वाशीम वाणिज्य विभागाने पॅसेंजर रेल्वेमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

    पूर्णा ते अकोला मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या 304 प्रवाशांवर मागील दीड महिन्यात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून 91 हजार 200 रुपयांचाही दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे फुकट्या प्रवाशांमध्ये धास्ती बसली आहे.