रेल्वे प्रवासात रेल्वे एजीएमची बॅग चोरी, चोरट्याला कल्याण जीआरपीने केली अटक

२८ नोव्हेंबर रोजी ११०२० कोणार्क एक्सप्रेसमध्ये बोगी नंबर ए-१ मधून सांकेत कुमार मिश्रा हे प्रवास करीत होते. त्या कल्याणच्या दिशेने प्रवास करीत होते. सांकेत हे रेल्वेत एजीएम पदावर कार्यरत आहे.

    कल्याण : रेल्वे एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या रेल्वे विभागातील असिस्टंट जनरल मॅनेजरची बॅग धावत्या ट्रेनमध्ये चोरीला गेली होती. अखेर बॅग चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक करुन चोरीस गेलेल्या किमंती वस्तू हस्तगत केल्या आहेत. अजय सरोज असे या चोरट्याचे नाव आहे. हा डोंबिवलीतील अहिरे गावात राहतो.

    २८ नोव्हेंबर रोजी ११०२० कोणार्क एक्सप्रेसमध्ये बोगी नंबर ए-१ मधून सांकेत कुमार मिश्रा हे प्रवास करीत होते. त्या कल्याणच्या दिशेने प्रवास करीत होते. सांकेत हे रेल्वेत एजीएम पदावर कार्यरत आहे. रात्री १२ ते ३ वाजताच्या दरम्यान त्यांनी त्यांची सॅकबॅग टी टेबलवर ठेवली होती. ते झोपल असताना चोरट्याने फायदा घेत. त्याने ही बॅग चोरी केली. बॅगेत महागडा लॅपटॉप दोन मोबाईल, दोन हार्ड डिस्क, रायटिंग पॅड आणि रोख रक्कमेसह अन्य कागदपत्रे होती. ही घटना लोणावळा ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान घडली होती. रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील, एसीपी आदिनाथ बुधवंत वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला गेला.

    पोलीस निरिक्षक प्रमोद देशमुख, पोलीस कर्मचारी कुटे, माेहिते, वाघ, यांनी तपास केला असता या प्रकरणातील चोरटा अजय सरोजला अटक केली आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासामुळे अजयला अटक केली आहे. अजय हा डोंबिवलीतील अहिेरे गावात राहतो. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अजयच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ट्रेनमध्ये अंटेंडण्ट असल्याचे सांगून फिरतो आणि चोरी करतो सध्या पुढील तपास सुरू आहे.