आष्टीमध्ये रेल्वेला भीषण आग; मोठे नुकसान झाल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

Breaking News : अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, मोठे नुकसान झाल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

    अहमदनगर : आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगीत रेल्वेचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.