breaking news

अपघातावेळी अनेक प्रवाशी त्यावरून जात होते. पुलाचा स्लॅब कोसळताच प्रवाशी थेट रेल्वे रुळांवर कोसळले. या अपघातात २० जण जखमी झालेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

    चंद्रपूर –  जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रविवारी फुट ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला. या पुलाची उंची जवळपास ६० फूट उंच होती. अपघातावेळी अनेक प्रवाशी त्यावरून जात होते. पुलाचा स्लॅब कोसळताच प्रवाशी थेट रेल्वे रुळांवर कोसळले. या अपघातात २० जण जखमी झालेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, बल्लारशाह स्थानकावर ही घटना घडली तेव्हा काझीपेट-पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर जात होते. अचानक पुलाच्या मध्यभागाचा स्लॅब कोसळला. यामुळे तेथून जाणारे प्रवाशी थेट रुळावर पडले. जखमी प्रवाशांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.