मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करणारी बातमी, मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार

रेल्वेच्या (Railway) मुख्य मार्गावर एसी लोकलच्या (Ac Local) १२ फेऱ्या वाढणार आहेत. एकूण रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ होणार आहे. तसेच १४ मे पासून म्हणजेच उद्यापासून १४ एसी लोकल सेवा या रुळांवर धावणार आहेत.

    मुंबई: काही दिवसांपूर्वी एसी लोकल (AC Local) गाड्यांच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्यात आली होती. आता रेल्वेने मुंबईच्या (Mumbai) लोकल प्रवाशांचा आनंद वाढवणारी आणखी एक बातमी दिली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा (Ac Local Service) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण- टिटवाळा- बदलापूर या मुख्य मार्गावर हलवण्याचे निश्चित केले आहे.

    एसी लोकल गाड्यांच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात केल्यानंतर रेल्वेने मुंबईच्या लोकल प्रवाशांना आणखी एक भेट दिली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल गाड्यांची सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल गाड्या सीएसएमटी- कल्याण- टिटवाळा- बदलापूर या मुख्य मार्गावर हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

    रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या १२ फेऱ्या वाढणार आहेत. एकूण रेल्वे मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या ४४ वरून ५६ होणार आहे. तसेच १४ मे पासून म्हणजेच उद्यापासून १४ एसी लोकल सेवा या रुळांवर धावणार आहेत. हार्बर मार्गावरील एसी लोकल मेन लाईनवर आणि मेन लाईनच्या नॉन एसी सेवा हार्बर लाईनवर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    रेल्वेने याआधी ५ मे रोजी भाड्यात कपात केल्यानंतर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली . संख्या वाढल्याने एसी लोकलची सेवा वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर सध्या १८१० लोकल धावतात. त्यापैकी ८९४ सेवा मेन लाईनवर, ६१४ हार्बरवर, २६२ ट्रान्स हार्बरवर आणि ४० सेवा चौथ्या कॉरिडॉरवर (उरण लाईन) धावतात. सध्या मध्य रेल्वेकडे एसी लोकलचे ५ रेक असून त्यात ४ मधून सेवा चालवली जात आहे, तर एकाची दुरूस्ती सुरू आहे.