Rain again in the district! Six medium projects overflowed, several villages lost connectivity

जिल्ह्यात मोठ्या धरणासह ९ मध्यम प्रकल्प २२ लघु प्रकल्प व दीड हजाराच्यावर मामा तलाव आहेत. त्यातच रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ पैकी ६ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो (Project over flow) झाले असताना १६ लघु प्रकल्प व पाठबंधारे विभागाच्या ३८ मालगुजारी तलावापैकी ३३ प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.

  गोंदिया : गेल्या मंगळवारी जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाने शनिवारच्या रात्रीपासून चांगलाच कहर केला आहे. त्यात रविवारीही दिवसभर पावसाची संततधार कायम होती. विशेषत: रात्रीच्या सुमारास बरसलेल्या दमदार पावसामुळे जिल्हा जलमग्न झाला. परिणामी जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे. तर नऊ पैकी सहा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) देण्यात आली असून पावसाचा उग्ररूप पाहता प्रशासन देखील अॅक्शन मोडवर आले आहे.

  गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दिवसभर उन्ह व रात्री पाऊस असा पावसाचा खेळ सुरू असताना गेल्या मंगळवारच्या रात्री पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. परिणामी जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असताना अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. दरम्यान, दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर हवामान खात्याकडून पुन्हा रविवारी ऑरेंज अलर्ट जारी (Orange alert issued) करण्यात आले होते. मात्र, पावसाने शनिवारच्या रात्रीपासूनच हजेरी लावली. रात्रभर पावसाच्या सरी बरसत असताना रविवारी १४ ऑगस्ट रोजी पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर अनेक नाल्यांना पूर आला असल्याने जिल्ह्यातील काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

  त्यातच जिल्ह्यातील ९ पैकी ६ मध्यम प्रकल्प पूर्ण भरले असल्याने ओव्हरफ्लो झालेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संबंधित गावांना सतर्कतेचा इशारा (Warning alert) देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश (Maharashtra and Madhya Pradesh) राज्याच्या सिमेवर असलेल्या बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रजेगाव येथील जुन्या पुलावरून अर्धा फूट वरून पाणी वाहत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (Department of Disaster Management) देण्यात आली आहे. तर या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

   या मार्गांवरील वाहतूक बंद

  रात्रीपासून येत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. ज्यामध्ये गोंदिया -आमगाव हा मुख्य मार्ग बंद झाल्याची माहिती असून सालेकसा तालुक्यातील सालेकसा ते निंबा, घोणसी ते नानव्हा व मुरूमटोला ते निंबा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर देवरी सिलापूर ते फुक्कीमेटा व डवकी ते सिलापूर मार्गही पूर्णपणे बंद झाला आहे. तर इतर तालुक्यातील नदी नालेही दुथडी भरून वाहत असून पावसाची संततधार कायम राहिल्यास आणखी अनेक मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   प्रकल्प झाले ओव्हर फ्लो

  जिल्ह्यात मोठ्या धरणासह ९ मध्यम प्रकल्प २२ लघु प्रकल्प व दीड हजाराच्यावर मामा तलाव आहेत. त्यातच रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ पैकी ६ मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो (Project over flow) झाले असताना १६ लघु प्रकल्प व पाठबंधारे विभागाच्या ३८ मालगुजारी तलावापैकी ३३ प्रकल्प शंभर टक्के भरले आहे.

   नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  संततधार पावसामुळे सिंचन प्रकल्पांतील पाण्याचा साठा वाढला आहे. प्रकल्प सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रकल्पांतील पाणी नद्यांत सोडणे सुरू केले आहे. यात शिरपूरबांध, कालीसरार, पुजारीटोला, संजय सरोवर, बावनथडीबांध या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाघनदी, वैनगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.