rain
संग्रहित फोटो

शेतकरी वर्गाला आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या पावसाला अखेर गेल्या दोन दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात सुरुवात झाली. तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातही पावसाच्या जोरदार सरी (Rain in Ambegaon Taluka) पडल्या. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील भात पिकाला जीवदान मिळाले आहे.

    रांजणी : शेतकरी वर्गाला आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या पावसाला अखेर गेल्या दोन दिवसांपासून आंबेगाव तालुक्यात सुरुवात झाली. तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातही पावसाच्या जोरदार सरी (Rain in Ambegaon Taluka) पडल्या. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील भात पिकाला जीवदान मिळाले आहे. घाटमाथ्यावरही काहीसा हलका पाऊस पडत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना सध्यातरी दिलासा मिळाला आहे.

    तालुक्याच्या पश्चिम भागात डिंभे धरण भरण्यासाठी पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून राहिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह हवेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आणि पाऊस पडू लागला. तालुक्यात गेल्या दोन दिवसात 8.38 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.

    खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करण्यासाठी शेतकरीवर्गाने शेतीची जोरदार पूर्व मशागत केली. परंतु, पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी विलंब होत होता. त्यातच गेले दोन दिवस तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पश्चिम भागातील भीमाशंकर पट्ट्यात पावसाच्या चांगल्या सरी पडत आहेत. डिंभे धरण पाण्याने पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तालुक्याच्या पश्‍चिम खोऱ्यात पावसाची नितांत गरज आहे.