
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागासह तिसगाव, करंजी, मिरी, खरवंडी कासार, मालेवाडी, मिडसांगवी, भालगाव, एकनाथवाडी, जवळवाडी, जांभळी, मोहटे, पालवेवाडी या परिसरात मुसळधार पाऊस (Rain in Pathardi) झाला. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले, ओढे व जमिनीत काही प्रमाणात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागासह तिसगाव, करंजी, मिरी, खरवंडी कासार, मालेवाडी, मिडसांगवी, भालगाव, एकनाथवाडी, जवळवाडी, जांभळी, मोहटे, पालवेवाडी या परिसरात मुसळधार पाऊस (Rain in Pathardi) झाला. या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाले, ओढे व जमिनीत काही प्रमाणात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रोहिणी नक्षत्रात कापूस, तूर, उडीद इत्यादी पिकांच्या पेरण्या पावसाला विलंब झाल्याने खोळंबल्या होत्या. परंतु, जून महिन्याच्या शेवटी का होईना वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने पेरणीची कामे सुरू होऊन पिकांची लागवड सुरु झाली आहे. परंतु, नदी, नाले, ओढे, तळे, मोठे तलाव आणि विहिरी भरण्यासाठी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.