rain in sindhudurg

हवामान खात्यानं पुढील तीन ते चार दिवस कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे कपिल नगर येथे मुसळधार पाऊस (Sindhudurg Rain Update) झाल्याने रस्त्यावरच पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    सिंधुदुर्ग: कुडाळ (Kudal) तालुक्याला पावसाने झोडपलं असून आज दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं पुढील तीन ते चार दिवस कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे कपिल नगर येथे मुसळधार पाऊस (Sindhudurg Rain Update) झाल्याने रस्त्यावरच पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.(Rain Update)

    रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारांची दुरवस्था झाल्यामुळे हे पाणी रस्त्यावर तुंबले असून यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांनासुद्धा त्रास सहन करावा लागतोय. तर वेताळबांबर्डे समाज मंदिर येथे रस्तासुद्धा मुसळधार पावसात खचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ताच पाण्याखाली गेल्यामुळे कपिल नगर येथील नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत या भागात गटारांची व्यवस्था होणे आवश्यक होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत दुर्लक्ष केल्यामुळे वेताळबांबर्डे कपिल नगर येथील नागरिकांना या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला.