मुंबई, रायगड, कोकणला आज ‘ऑरेंज अलर्ट’

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर, मुंबई (Mumbai), पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

    नैऋत्य मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अद्याप सक्रिय झालेला दिसत नाही. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर, मुंबई (Mumbai), पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

    भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात बंगालचा उपसागर, ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये (Sikkim) मुसळधार पावसाची शक्यता आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर, १९ ते २१ जूनदरम्यान बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    पश्चिम हिमालयीन भागात आज मेघगर्जनेसह पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या वायव्येकडील भागात पावसाची शक्यता आहे. तसेच, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.