rain in maharashtra

पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता आहे. यामुळे यंदा लवरच मान्सूनचे आगमन होणार आहे(Rain will arrive in Maharashtra on May 26 this year)

    मुंबई : पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता आहे. यामुळे यंदा लवरच मान्सूनचे आगमन होणार आहे(Rain will arrive in Maharashtra on May 26 this year)

    दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून या आठवड्यातच अंदमान बेटावर दाखल होणार असून तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

    10 आणि 12 मे दरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 09-12 मे दरम्यान आसाम-मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात म्हणजेच 26 मे  महाराष्ट्रात पूर्व मान्सून दाखल होईल त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र या वादळामुळे मान्सुन पुढे जाणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

    चक्रीवादळाचा जोर ओसरला

    हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळ आता बांग्लादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले असून 19 किमी प्रतीतास या वेगाने हे वारे वाहत आहेत. चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये धडकेल्याने या राज्यांत मुसळधार पाऊसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.