संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

तालुक्यातील नागाझरी येथे पावसासह वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट झाली. इतरही गावात गारपिटीसह पाऊस झाला. या गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांच्या गहू, चणा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    कारंजा : तालुक्यातील नागाझरी येथे पावसासह वीस ते पंचवीस मिनिटे गारपीट झाली. इतरही गावात गारपिटीसह पाऊस झाला. या गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांच्या गहू, चणा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांसह संत्रा बागायतदारांचे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश काढावे, अशी मागणी सरपंच रमेश लोहकरे नागाझरी यांनी केली. फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

    दरम्यान, या नुकसानीचे विलंबाने पंचनामे झाल्यानंतर स्थानिक यंत्रणेकडून शासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. नुकसानभरपाई मिळायचीच असताना कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात तालुक्यातील नागाझरी येथील संत्रा बागायतदारांसह पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

    नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करावे

    शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अगोदरही गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यात शेतकऱ्यांना अजूनपर्यंत आर्थिक नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यात पुन्हा गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान केले आहे. त्यामुळे प्रशासनाने गारपिटीग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.