संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पुणे,पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाने शहराला झोडपले. सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरात पाणीच पाणी झाले होते. तर, सायंकाळीही जोरादर पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे समोरचे दिसत नव्हते. रस्तेही जलमय झाले होते. यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अंदाज येत नव्हता. परिणामी वाहतूक संथ गतीने मार्गस्थ होत होती.

    पिंपरी : पुणे,पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाने शहराला झोडपले. सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरात पाणीच पाणी झाले होते. तर, सायंकाळीही जोरादर पावसाच्या सरी कोसळल्या. मुसळधार पावसामुळे समोरचे दिसत नव्हते. रस्तेही जलमय झाले होते. यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अंदाज येत नव्हता. परिणामी वाहतूक संथ गतीने मार्गस्थ होत होती.

    सप्टेंबर महिन्याचे स्वागतच पावसाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, सुरवातीचे पहिल्या दोन आठवड्यात पाऊस काही पडला नाही. तर, त्यानंतर मात्र, मध्येच सरी कोसळत होत्या. हवामान विभागाने रायगड, गोंदिया, भंडारा आणि नागपूर भागातील बहुतांश भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस शक्‍यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, पुढील दोन दिवस पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे. दिवसभरात हलका ते अतिहलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच सोमवार आणि मंगळवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    गौरीसोबत अनेकांच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन होते. त्यामुळे विसर्जनासाठी आलेल्यांनी पावसात भिजत आनंद लुटला. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साठले होते. दुपारी १ नंतर सुरू झालेला पावसाची सायंकाळपर्यंत भुरभुर सुरूच होती. दुपारी तीन नंतर पुन्हा पावसाने जोर धरला. मुसळधार पावसातही नागरिकांचा उत्साह मोठा होता. तर, विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले होते. कार्यालयांना सुटी असल्याने वाहतूक काहीशी विरळ पण संथ गतीने सुरू होती.