ऐन थंडीच्या मोसमात पावसाची हजेरी, मुंबईकरांची उडाली पुरती भंबेरी

हवामान बदलामुळे अचानक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा हिवाळा सुरु आहे की पावसाळा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबईत पावसाच्या सरी बरसणार (Rainfall In Mumbai) असल्याचा अंदाज हवामान खात्यानं (Weather Forecast) आधीच वर्तवला होता. त्याप्रमाणे मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील (Rainfall In Various Regions Of Maharashtra) नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे.

    मुंबई : ऐन थंडीच्या दिवसांत मुंबईत पावसांच्या हलक्या (Rain in Mumbai) सरी बरसल्याने वातावरणातील गारवा वाढला आहे. हवामान बदलामुळे अचानक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा हिवाळा सुरु आहे की पावसाळा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबईत पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं (Weather Forecast) आधीच वर्तवला होता. त्याप्रमाणे मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. तसेच गुजरात आणि लगतच्या मध्यप्रदेशातील काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस पडला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात मात्र मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच येत्या काही तासातही काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    मिरचीच्या पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मिरचीचे उत्पन्न होते. व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपली मिरची सुकवण्यासाठी मोकळ्या मैदानात टाकली होती. मात्र अचानक पाऊस आल्याने मिरची भिजली तसेच मजुरांची देखील तारांबळ उडाली. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू आणि ज्वारीचे पिक भुइसपाट झाले असून, ढगाळ हवामानामुळे हरभाऱ्यावर देखील अळीचा प्रादुर्भाव होण्याचा दाट शक्यता आहे. ऐन हातातोंडाळी आलेल्या हात हिरावल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

    ढगाळ वातावरण असल्याने थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, गारठा वाढला आहे. किमान तापमानात देखील घट नोंदवण्यात आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.